चिदंबरम यांना न्यायालयाकडून तूर्त दिलासा; अटकेपासून संरक्षण

चिदंबरम यांना न्यायालयाकडून तूर्त दिलासा; अटकेपासून संरक्षण

नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया गैरव्यवहारप्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना तूर्त दिलासा दिला आहे. न्यायालयाने चिदंबरम यांच्या अंतरिम संरक्षणाची मुदत वाढवल्याने चिदंबरम यांना चौकशीसाठी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) अटक करता येणार नाही.

चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन दिल्ली उच्च न्यायालयाने यापूर्वी फेटाळला होता. त्याविरोधात चिंदबरम यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर उद्या सुनावणी घेण्यात येणार आहे. तत्पूर्वी न्यायालयाने चिदंबरम यांच्या अंतरिम संरक्षणाची मुदत वाढवली आहे. त्यामुळे त्यांना अटकेपासून संरक्षण मिळाले आहे. 

आयएनएक्स मीडिया कंपनीत 305 कोटी रुपयांच्या परकीय गुंतवणुकीस लाच घेऊन नियमबाह्य मंजुरी दिल्याच्या आरोपावरून चिदंबरम यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना काल आणखी चार दिवस सीबाआय कोठडीत ठेवण्याचे आदेश येथील विशेष न्यायालयाने दिले. मात्र, या प्रकरणी ईडीकडून होणारी संभाव्य अटक टाळण्यासाठी चिदंबरम यांनी केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. त्यामध्ये त्यांना दिलासा मिळाला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com