स्विस बँकेतील काळ्या पैशाची माहिती नाही; सरकारची लोकसभेत माहिती

अर्थ राज्यमंत्र्यांची लोकसभेत प्रश्नाच्या उत्तरादाखल दिली लिखित माहिती
swiss bank.jpg
swiss bank.jpg

नवी दिल्ली : स्विस बँकेत गुप्तपणे ठेवलेल्या भारतीयांच्या काळ्या पैशाची कुठलीही माहिती सरकारकडे उपलब्ध नाही, अशी माहिती अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सोमवारी लोकसभेत लेखी उत्तरात दिली. गेल्या दहा वर्षात स्विस बँकेत किती काळा पैसा जमा झाला? आणि त्यावर सरकारनं काय कारवाई केली? असा प्रश्न सभागृहात विचारण्यात आला होता. (No estimate black money stashed Swiss Bank for last 10 years Finance ministry aau85)

या प्रश्नाला उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री चौधरी म्हणाले, "सरकारने स्विस बँकेत भारतीयांनी ठेवलेला काळा पैसा परत देशात आणण्यासाठी अनेकदा पावलं उचलली आहेत. पण गेल्या दहा वर्षातील या काळ्या पैशाबाबतचं कुठलही अंदाजपत्रक उपलब्ध नाही."

swiss bank.jpg
आसाम-मिझोराम सीमेवर हिंसाचार; अमित शहांकडे हस्तक्षेपाची मागणी

दरम्यान, लोकसभेत या संदर्भात आणखीन एक प्रश्न विचारण्यात आला. काळा पैसा लपवून ठेवणाऱ्या आणि कर चुकवणाऱ्या किती जणांवर कारवाई झाली किंवा त्यांना अटक करण्यात आली? असा हा प्रश्न होता. त्यावर उत्तर देताना अर्थ मंत्रालयानं सांगितलं की, "प्राप्तीकर विभागानं कर चुकवेगिरी करणाऱ्या अशा लोकांवर संबंधित कायद्यांतर्गत योग्य त्या कारवाया केल्या आहेत."

swiss bank.jpg
पेट्रोल-डिझेलवरील कराचा वापर पायाभूत सुविधांच्या विकासासाठी - केंद्र

यामध्ये कर चुकवणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांवर प्राप्तीकर विभागानं धाडी टाकल्या आहेत. त्यांचं सर्वेक्षण करण्यात आलंय, चौकशा झाल्या आहेत, कर भरण्यास प्रवृत्त करण्यात आलं, करावर दंडही लावण्यात आलाय तसेच व्याज आणि दंडही ठोठावण्यात आला आहे. तसेच फौजदारी कोर्टात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत, अशी माहिती अर्थ मंत्रालयानं लोकसभेत दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com