मद्यसम्राट विजय मल्याला उच्च न्यायालयाचा दणका

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 11 जुलै 2019

मालमत्ता जप्त न करण्याची मागणी नामंजूर

मुंबई- उद्योगपती विजय मल्याला आज (ता.11) मुंबई उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला. फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित करुन मालमत्ता जप्त करण्याच्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयाने फेटाळली.

तब्बल नऊ हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केला आहे. मल्या सध्या इंग्लंड मध्ये असल्यामुळे त्याच्याविरोधात फरार आर्थिक गुन्हेगार कायद्यानुसार कारवाई केली आहे.

विजय मल्ल्याची मालमत्ता जप्त करण्याची कारवाईदेखील सुरू केली आहे. याला मल्याने याचिकेत विरोध केला होता. मात्र, फरार आरोपी परत येण्यासाठी ही कारवाई केली जाते, हा ईडीचा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला आणि कोणताही दिलासा न देता याचिका नामंजूर केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No HC relief to Vijay Mallya on seizure of assets