पूरग्रस्तांना केंद्राकडून आवश्‍यक मदत नाही : राहुल गांधी

पीटीआय
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

कोची : पुरामुळे उद्‌ध्वस्त झालेल्या केरळला आवश्‍यक तेवढी मदत केंद्र सरकारकडून दिली जात नाही, याप्रकरणी सरकारचा दृष्टिकोन दुर्दैवी असल्याचा आरोप कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केला. पुराच्या संकटाने मोडून पडलेल्या केरळची पुन्हा पुनर्बांधणी करण्यासाठी "यूएई'सारख्या देशांची मदत घेण्यात काहीही हरकत नसल्याचे गांधी यांनी या वेळी स्पष्ट केले. 

कोचीत पत्रकारांशी बोलताना गांधी म्हणाले, ""केंद्र सरकारकडून मदत मिळणे हा पूरग्रस्त भागातील नागरिकांचा हक्क आहे. मात्र, केरळमधील पूरग्रस्तांना आवश्‍यक ती मदत केंद्र सरकारकडून दिली जात नाही. ही बाब अतिशय दुर्दैवी आहे. केरळमधील संकटात अडकलेल्या लोकांच्या वेदना कमी करण्यासाठी जर कोणी कुठलीही अट न घालता मदत देत असेल तर ती स्वीकारली पाहिजे, असे माझे मत आहे.'' 
गांधी हे पूरग्रस्त केरळच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांच्याशी मंगळवारी चर्चा झाल्याची माहिती गांधी यांनी दिली. 

मदतीमध्ये राजकारण नको 

केरळमधील परिस्थितीचे राजकारण करण्यासाठी मी येथे आलेलो नाही, मात्र केंद्र सरकारचा दृष्टिकोन चिंताजनक असल्याचे गांधी यांनी स्पष्ट केले. गांधी यांनी मंगळवारी अनेक ठिकाणच्या मदत छावण्यांना भेटी दिल्या. तसेच, पूरग्रस्तांच्या मदत आणि पुनर्वसनाच्या कामात कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, अशी सूचनाही गांधी यांनी केली. 

Web Title: No help from union government says Rahul Gandhi