महासभेच्या याचिकेवर तत्काळ सुनावणी नाही 

पीटीआय
बुधवार, 23 मे 2018

कॉंग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल आघाडीला कर्नाटकात सत्तास्थापनेसाठी निमंत्रण देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज नकार दिला.

 

नवी दिल्ली : कॉंग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल आघाडीला कर्नाटकात सत्तास्थापनेसाठी निमंत्रण देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज नकार दिला.

ही याचिका अखिल भारतीय हिंदू महासभेने दाखल केली आहे. कॉंग्रेस आणि जेडीएस या पक्षांनी निवडणुकीनंतर आघाडी करून मतदारांची फसवणूक करण्यात आली असून, हे राज्यघटनेच्या विरोधात असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. मात्र, या याचिकेवर तत्काळ सुनावणी घेता येणार नाही, क्रमवारीनुसारच योग्य वेळी त्यावर सुनावणी होईल, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

Web Title: no immediate hearing on hindu mahasabha PIL