श्रीदेवी यांच्या मृत्यूची स्वतंत्र चौकशी नाही

वृत्तसंस्था
शुक्रवार, 11 मे 2018

नवी दिल्ली: अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूची स्वतंत्र चौकशी करण्याच्या मागणीसाठी केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली.

दुबईच्या हॉटेलमधील बाथटबमध्ये बुडून श्रीदेवी यांचा 24 फेब्रुवारीला मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची स्वतंत्रपणे चौकशी करण्यासाठी सुनील सिंग यांनी याचिका दाखल केली होती. या प्रकरणी भारत व दुबईतील अधिकाऱ्यांनी याचा तपास केला असल्याने या याचिकेवर सुनावणीस दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला. त्यानंतर सिंग सर्वोच्च न्यायालयात गेले होते.

Web Title: no independent inquiry into the death of Sridevi