गंगेतील 'त्या' मृतदेहांची आकडेवारी नाही; केंद्राची राज्यसभेत माहिती

सरकारच्या या उत्तरानंतर देशातील राजकारण पुन्हा तापण्याची चिन्ह दिसू लागली आहे.
Dead Body In ganga River
Dead Body In ganga River Sakal

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गंगा नदीत नेमके किती मृतदेह फेकण्यात आले याबाबत केंद्राकडे कोणतीही ठोस आकडेवारी उपलब्ध नसल्याची माहिती सोमवारी केंद्रातर्फे राज्यसभेत दिली आहे. (Corona Death) सरकारच्या या उत्तरानंतर गंगानदीतील फेकलेल्या मृतदेहांवरून देशातील राजकारण पुन्हा तापण्याची चिन्ह दिसू लागली आहे. (Government Answer On Ganga River Dead Body )

Dead Body In ganga River
सरकारच्या धोरणांमुळे देशातील तरूणांची ताकद वाढली : मोदी

तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जलशक्ती मंत्री बिश्वेश्वर तुडू यांनी हे लेखी उत्तर दिले आहे. सरकारच्या या उत्तरावर काँग्रेसने टीका केली असून, देण्यात आलेले उत्तर हे ऑक्सिजनच्या (Oxygen) कमतरतेमुळे झालेल्या मृत्यूंबद्दलच्या प्रश्नांना दिलेल्या उत्तरासारखेच असल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते केसी वेणुगोपाल यांनी केली आहे.

Dead Body In ganga River
महाराष्ट्र काँग्रेसनं यूपी-बिहारमध्ये कोरोना पसरवला - PM मोदी

तुडू म्हणाले की, “नदीत किंवा तिच्या काठावर अज्ञात आणि अंशतः जळालेले मृतदेह आढळून आले होते. दरम्यान हा सर्व प्रकार उत्तर प्रदेश आणि बिहारमधील जिल्ह्यांमधून समोर आल्याचे ते म्हणाले. यानंतर “मंत्रालयाने नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगाच्या माध्यमातून संबंधित राज्य सरकारांकडून मृतदेह आणि विल्हेवाट लावण्यासह केलेल्या कार्यवाहीचा अहवाल मागवल्याचे तुडू यांनी सांगितले. गेल्या वर्षी मे-जूनमध्ये पवित्र गंगा नदीमध्ये तरंगणाऱ्या मृतदेहांची भीषण छायाचित्रे समोर आली होती. तसेच सर्वोच्च न्यायालयाने देकील हे गंभीर असल्याचे म्हणत संबंधित सरकारांना फटकारले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com