जयललितांच्या मृत्यूसंबंधीच्या याचिका न्यायालयाने फेटाळल्या

पीटीआय
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

अण्णा द्रमुक पक्षातून निलंबित करण्यात आलेल्या राज्यसभेच्या खासदार शशिकला पुष्पा यांच्या याचिकेचाही यामध्ये समावेश होता. न्यायाधीश पी. सी. घोष आणि न्यायाधीश आर. एफ नरिमन यांच्या खंडपीठाने, अशा प्रकारची एक याचिका मद्रास उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याचे सांगून, शशिकला पुष्पा यांच्यासह एका स्वयंसेवी संस्थेने दाखल केलेली फेरविचार याचिकाही फेटाळली

नवी दिल्ली - अण्णा द्रमुकच्या दिवंगत नेत्या जे. जयललिता यांच्या मृत्यूची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) किंवा एखाद्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत न्यायालयीन चौकशीची मागणी करणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळल्या.

अण्णा द्रमुक पक्षातून निलंबित करण्यात आलेल्या राज्यसभेच्या खासदार शशिकला पुष्पा यांच्या याचिकेचाही यामध्ये समावेश होता. न्यायाधीश पी. सी. घोष आणि न्यायाधीश आर. एफ नरिमन यांच्या खंडपीठाने, अशा प्रकारची एक याचिका मद्रास उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याचे सांगून, शशिकला पुष्पा यांच्यासह एका स्वयंसेवी संस्थेने दाखल केलेली फेरविचार याचिकाही फेटाळली. जयललिता यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप शशिकला पुष्पा यांनी त्यांच्या याचिकेत केला होता.
 

Web Title: No investigation regarding Jayalalitha's death