मशिदींवर भोंग्यांच्या वादादरम्यानच मथुरेतल्या कृष्ण मंदिराचा मोठा निर्णय

योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकरच्या आवाजासंदर्भातली नियमावली जारी केली असून त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
Mathura Shree Krishna Temple
Mathura Shree Krishna TempleSakal

मथुरेतल्या श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिराने मंदीर परिसरातले सगळे लाऊडस्पीकर्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेश सरकारने नुकतंच धार्मिक स्थळांवर साऊंड सिस्टीम वापरण्यासंदर्भातली नवी नियमावली जारी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर हे बदल करण्यात आल्याचं मंदीर व्यवस्थापनानं सांगितलं आहे.

श्री कृष्ण जन्मभूमी ट्रस्ट आणि श्री कृष्ण जन्मस्थान सेवा संस्थानाचे सचिव कपिल शर्मा म्हणाले की श्री कृष्ण जन्मभूमी मंदीर परिसरातल्या सर्वात उंच भागवत भवन इथं लावलेले लाऊडस्पीकर काल बंद करण्यात आले. यापुढे इथले लाऊडस्पीकर्स अगदी हळू आवाजात लावले जातील. त्यामुळे भजन कीर्तनाचा आवाज मंदीर परिसरातून बाहेर जाणार नाही. सकाळी होणाऱ्या मंगल आरतीपासून प्रत्येक धार्मिक विधीसाठी लाऊडस्पीकर्सचा वापर केला जात असल्याचंही त्यांनी सांगितलं

Mathura Shree Krishna Temple
‘यूपी’त मिरवणुकांसाठी परवानगी अनिवार्य, योगींचे निर्देश

प्रत्येकाला आपल्या धार्मिक विचारधारेप्रमाणे प्रार्थना करण्याचं स्वातंत्र्य आहे हे नमूद करत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकरच्या आवाजासंदर्भातली नियमावली जारी केली. तुम्ही माईक वापरू शकता पण आवाज मंदीर परिसरातून बाहेर जाणार नाही, याची खबरदारी घ्या, इतरांना आवाजाचा त्रास होणार नाही हे पाहा, असं योगी आदित्यनाथ म्हणाले. नव्या ठिकाणी माईक्स बसवण्याची परवानगी दिली जाणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.

कोणताही धार्मिक विधी परवानगीशिवाय करता येणार नाही. तसंच परवानगी केवळ पारंपरिक समारंभ आणि विधींनाच देण्यात येईल. नव्याने सुरू करण्यात येणाऱे समारंभ अथवा विधींना विनाकारण परवानगी दिली जाणार नसल्याचं योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com