''असदुद्दीन ओवेसीला खरेदी करु शकेल असा कोणी जन्माला आला नाही''

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 16 December 2020

ओवैसीला पैशाने विकत घेऊ शकेल असा कोणी जन्माला आला नाही, असं म्हणत एआयएमआयएम प्रमुखांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला.

कोलकाता- ओवैसीला पैशाने विकत घेऊ शकेल असा कोणी जन्माला आला नाही, असं म्हणत एआयएमआयएम प्रमुखांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला. बंगालमधील मुस्लीमांची मतं विभागण्यासाठी भाजप प्रचंड पैसे खर्च करुन हैदराबादमधील एक पक्ष येथे आणू पाहात आहे, असा आरोप बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी केला होता. 

मुस्लीम मतं ममता बॅनर्जींची जागीर किंवा संपत्ती नाहीत. असा माणूस जन्मालाच आला नाही, जो असदुद्दीन ओवैसीला पैशाने खरेदी करु शकेल. ममतांचा आरोप निराधार आहे. ममता स्वत:च घाबरलेल्या आहेत. शिवाय त्यांचे अनेक नेते भाजपमध्ये जात आहेत. त्यांनी बिहारच्या जनतेचा अपमान केला, ज्यांनी आम्हाला मतदान केलं त्यांचाही अपमान केला, असा हल्लाबोल मजलीस-ए-इत्तेहादूल-उल-मुसलमीन All India Majlis-e-Ittehad-ul-Muslimeen (AIMIM) पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी केला. 

ज्येष्ठ नागरिकांना मोदी सरकारचं गिफ्ट; एअर इंडियाच्या विमानात हाफ तिकिट

बिहार विधानसभा निवडणुकीत एआयएमआयएमने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे ओवैसी यांनी पुढील वर्षी पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या निवडणुकाही लढण्याचा निर्णय घेतला आहे. एआयएमआयएमने पश्चिम बंगालला लागून असलेल्या बिहारच्या सिमांचल प्रदेशात विधानसभेच्या 5 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला असून ते आपलं नशीब पश्चिम बंगालमध्येही अजमावू पाहात आहेत.

मुस्लीम मतांची विभागणी करण्यासाठी भाजप कोट्यवधी रुपये खर्च करत आहेत. त्यातून हैदराबादमधील एक पक्ष पश्चिम बंगालमध्ये आणला जात आहे. भाजप हिंदू मतं खाईल आणि हैदराबादचा पक्ष मुस्लीम मतं खाईल, असा त्यांचा प्लॅन आहे. बिहार निवडणुकीमध्ये भाजपने असंच केलं. हैदराबादचा पक्ष भाजपची बी-टीम आहे, अशी टीका ममता बॅनर्जी यांनी जलपायगुरी येथेल सभेत बोलताना केली होती. 

Gold Price - सलग दुसऱ्या दिवशी सोनं महागलं; चांदीच्या दरातही वाढ

तुम्हाला असे मुस्लीम आवडत नाहीत, जे स्वत:च्या हिताबद्दल बोलतात. तुम्ही बिहारमधील आमच्या मतदारांचा अपमान केला. ज्यांनी दुसऱ्यांवर आरोप केले त्यांचं काय झालं हे बिहारमध्ये दिसलं. मुस्लीम मतं तुमची जागीर नाही, असं ट्विट औवैसी यांनी केलं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No Man Can Buy Asaduddin Owaisi said AIMIM Chief Slams Mamata Banerjee