सीबीएसई टर्म १ ची परीक्षा देणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CBSE

CBSE टर्म १ ची परीक्षा देणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी

सीबीएसईच्या टर्म १ चा निकाल आज जाहीर करण्यात आला. ही टर्म १ असल्याने आता कोणतीही मार्कशीट किंवा उत्तीर्ण प्रमाणपत्र जारी करण्यात आले नसल्याची माहिती सीबीएसईने एका निवेदनात दिली आहे.

सीबीएसईने एका निवेदनात म्हटले आहे की बोर्डाने इयत्ता १० वीच्या सीबीएसई टर्म १ चा निकाल केवळ विद्यार्थ्यांच्या कामगिरीबद्दल शाळांना माहिती देण्याकरीता दिला. ही टर्म १ असल्याने आता कोणतीही मार्कशीट किंवा उत्तीर्ण प्रमाणपत्र जारी करण्यात आले नाही. टर्म १ आणि टर्म २ यांच्या निकालाची एकत्रित मार्कशीट दिली जाईल. त्यात टर्म १ आणि टर्म २ च्या एकूण गुणांचा समावेश असेल.

हेही वाचा: दिल्ली, पंजाबनंतर आता आपचे लक्ष्य 'या' राज्यांकडे; सुरू करणार सदस्य नोंदणी अभियान

१० वीच्या सीबीएसई टर्म २ ची परीक्षा २६ एप्रिलपासून २४ मे पर्यंत आहे. या संदर्भात माहिती अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. त्याचबरोबर संपूर्ण टाइम-टेबल वेबसाइटवरुन डाउनलोड केला जाऊ शकतो.

Web Title: No Mark Sheet Cum Passing Certificate Is Being Issued Now For Term 1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..