जगाचा त्याग केल्याने राम रहिम दंड भरु शकत नाही!

ram rahim singh
ram rahim singh

चंडीगड - बलात्कार प्रकरणी शिक्षा सुनाविण्यात आलेला डेरा सच्चा सौदाचा बाबा रामरहिम याने "सर्वसंग परित्याग' केला असल्याने न्यायालयाकडून ठोठाविण्यात आलेला 30 लाख रुपयांचा दंड तो भरु शकत नाही, अशी माहिती रामरहिमच्या वकिलांनी आज (मंगळवार) पंजाब हरयाना उच्च न्यायालयास दिली.

रामरहिम याला केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने बलात्कार प्रकरणी 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनाविली आहे. या शिक्षेला रामरहिम याच्याकडून उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. रामरहिम याने बलात्कार केलेल्या दोन महिलांनीही त्याची शिक्षा आणखी वाढविण्यात येऊन जन्मठेपेमध्ये बदलण्यात यावी, या मागणीसाठी न्यायालयात धाव घेतली आहे.

या पार्श्‍वभूमीवर रामरहिम याची बाजु मांडणाऱ्या वकिलांनी न्यायालयात ही माहिती दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com