सरदार पटेलांवर कुणाचा 'कॉपीराईट' नाही: मोदी

वृत्तसंस्था
मंगळवार, 1 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली: 'सरदार वल्लभभाई पटेल कुणाची मक्तेदारी नाही. देशाची एकता हीच त्यांची ओळख आहे,' असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (सोमवार) केले. सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त देशभरात 'रन फॉर युनिटी' हा उपक्रम राबविण्यात आला.

राजधानीत झालेल्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान मोदी यांनी सरदार पटेल यांच्या आयुष्यावरील डिजिटल प्रदर्शनाचेही उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, "विरोधी पक्षांच्या भाषेत मी 'भाजपवाला' आहे आणि सरदार पटेल 'कॉंग्रेसवाले'! तरीही आपण सर्व एकत्र येऊन त्यांची जयंती सारख्याच उत्साहाने साजरी करत आहोत. यालाच एकता म्हणतात. 'सरदार पटेल यांची जयंती भाजप का साजरी करत आहे' असा प्रश्‍न काही जण उपस्थित करतात. पण सरदार पटेल यांच्यावर कुणाचाही 'कॉपीराईट' नाही. त्यांनी आयुष्यभर देशासाठीच कार्य केले.''

त्यापूर्वी मोदी यांनी ट्विटरवर पटेल यांना श्रद्धांजली अर्पण करताना एक छायाचित्र पोस्ट केले. रविवारी "मन की बात'मध्येही नरेंद्र मोदी यांनी सरदार पटेल यांच्या कार्याविषयी उल्लेख केला होता. दरम्यान, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची 31 ऑक्‍टोबर रोजीच हत्या झाली होती. पण याचा उल्लेख न करणाऱ्या पंतप्रधान मोदी यांच्यावर कॉंग्रेसने टीका केली.

Web Title: No one has copyright on Sardar Patel, says PM Narendra Modi