मोदींच्या 'त्या' व्हिडिओवर एकही रूपया खर्च नाही

वृत्तसंस्था
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

मोदींच्या या व्हिडिओवर 35 लाख रूपयांचा खर्च आला, असा आरोप काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी ट्विटरवरून केला होता. यावर स्पष्टीकरण देत, 'हा व्हिडिओ शूट करणारा कॅमेरामनही पंतप्रधान कार्यालयातील कर्मचारी होता' अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फिटनेस चॅलेंज व्हिडिओची चांगलीच चर्चा झाली. अनेकांनी त्यावर टीका देखील केली. या व्हिडिओच्या खर्चावर प्रश्न केले गेले, पण आता, या व्हिडिओवर एकही रूपया खर्च केला गेला नाही, असे स्पष्टीकरण पंतप्रधान कार्यालयाने दिले आहे.  

माहिती अधिकाराच्या अंतर्गत विचारण्यात आलेल्या या प्रश्नावर पंतप्रधान कार्यालयाने स्पष्टीकरण दिले आहे. या फिटनेस चॅलेंज व्हिडिओसाठी एकही रूपया खर्च झाला नसल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे. जून महिन्यात सुरू झालेल्या या फिटनेस चॅलेंजमध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने हे चॅलेंज मोदींना दिले होते. त्यांनी हे चॅलेंज स्विकारून त्यावर एक व्यायाम करतानाचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. 

मोदींच्या या व्हिडिओवर 35 लाख रूपयांचा खर्च आला, असा आरोप काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी ट्विटरवरून केला होता. यावर स्पष्टीकरण देत, 'हा व्हिडिओ शूट करणारा कॅमेरामनही पंतप्रधान कार्यालयातील कर्मचारी होता' अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली. क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी हे फिटनेस चॅलेंज सुरू केले होते.

Web Title: no one rupees expenditure on modi fitness challenge video