'अयोध्या प्रश्नावर न्यायालयाबाहेर तोडगा अशक्य'

वृत्तसंस्था
सोमवार, 27 मार्च 2017

लखनौ - अयोध्या प्रकरणावर न्यायालयाबाहेर तोडगा निघणे अशक्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राम मंदिराचे समर्थक आहेत, त्यांच्याशी बोलणी करुन मुस्लिमांना न्याय मिळण्याची आशा नाही, असे बाबरी मशीद कृती समितीचे संयोजक जफरयाब गिलानी यांनी सांगितले.

अयोध्या प्रश्नावर दोन्ही बाजूच्या लोकांनी एकत्र येऊन न्यायालयाबाहेर चर्चा करुन एकमताने तोडगा काढावा अशी सूचना गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने केली होती. त्यानंतर बाबरी मशीद कृती समितीच्या बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली. 

यापूर्वीचे पंतप्रधान अयोध्या प्रश्नाबाबत तटस्थ होते. यापूर्वी चंद्रशेखर आणि पी. व्ही. नरसिंहराव पंतप्रधानपदी असताना या वादाचा तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. गेल्या तीन दशकांच्या अनुभवावरुन असे दिसते, की न्यायालयाबाहेर या वादाचा तोडगा निघणे अशक्य आहे. या प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयातच लागू शकतो, असेही गिलानी म्हणाले. 

भाजपतर्फे सर्वोच्च न्यायालयाच्या या सुचनेचे स्वागत करण्यात आले. या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन दोन्ही बाजूच्या लोकांनी एकमताने तोडगा काढणेच योग्य राहील अशी भूमीका भाजपने घेतली आहे.

Web Title: No out-of-court settlement about Ayodhya