मोदींशी सहमत नसाल तर देशात स्थान नाही- राहुल

वृत्तसंस्था
गुरुवार, 6 एप्रिल 2017

सरकार आपल्या जबाबादारीपासून पळत आहे आणि असे हल्ले करणाऱ्यांना परवानगीच देत आहे. त्यामुळे अशा तीव्र घटना घडत आहेत. अल्वरमधील कायदा आणि सुव्यवस्थेचे पूर्णपणे ढासळली आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) यांचे न ऐकणाऱ्यांना आणि त्यांच्या विचारांशी सहमत नसणाऱ्यांना भारतात स्थान नाही. असेच धोरण सध्या ते राबवत आहेत, अशी टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.

राजस्थानमधील अल्वर जिल्ह्यात गाय तस्करीच्या संशयावरून एका जणाची गोरक्षकांकडून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणावरून राहुल गांधी यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी अशा प्रकारे हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी सरकारकडे केली आहे.

राहुल गांधी म्हणाले, की सरकार आपल्या जबाबादारीपासून पळत आहे आणि असे हल्ले करणाऱ्यांना परवानगीच देत आहे. त्यामुळे अशा तीव्र घटना घडत आहेत. अल्वरमधील कायदा आणि सुव्यवस्थेचे पूर्णपणे ढासळली आहे. अशा घटनांचा निषेध करण्याचा अधिकार भारतीयांना आहे. 

Web Title: No place in India for those who disagree with Modi and RSS: Rahul Gandhi targets govt on Alwar assault