पोलिसांनी शस्त्र, आणि बूट घालून मंदिरात जाऊ नये- सर्वोच्च न्यायालय

No policeman should enter Puri Jagannath temple with weapons shoes orders Supreme Court
No policeman should enter Puri Jagannath temple with weapons shoes orders Supreme Court

नवी दिल्ली- ओडिशा राज्यातील जगन्नाथ मंदिरात पोलिसांनी शस्त्र घेऊन आणि बूट घालून जाऊ नये असे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. 03 ऑक्टोबर रोजी दर्शनासाठी भाविकांना रांगेत उभारण्यासाठी यंत्रणा लागू करताना झालेली हिंसा लक्षात घेता न्यायालयाने ही सूचना केली आहे. 03 ऑक्टोबर रोजी एका सामाजिक संघटनेने रांगेने दर्शन घेण्याच्या व्यवस्थेविरोधात 12 तासांचा बंद पुकारण्यात आला होता. या दरम्यान, मंदिर परिसरात झालेल्या हिंसाचारात 09 पोलीस कर्मचारी जखमी झाले होते.

या प्रकरणी सुनावणी दरम्यान ओडिशा सरकारने न्यायालयाला म्हटले की, पुरी येथील जगन्नाथ मंदिरात झालेल्या हिंसेप्रकरणी 47 लोकांना अटक करण्यात आली आहे. तेथील परिस्थिती आता नियंत्रणात आहे. मंदिर प्रशासन कार्यालयावर हल्ला करुन तोडफोड करण्यात आली होती, असे सरकारने म्हटले. मंदिर प्रशासनाने प्रायोगिक तत्वावर रांगेत दर्शन घेण्याची व्यवस्था केली आहे. त्याची समिक्षा करुन पुढील निर्णय घेतला जाईल.

दरम्यान, जगन्नाथ मंदिर हे भारताच्या ओडिशा राज्यातील पुरी शहरामधील एक मंदिर आहे. मंदिरामध्ये श्रीजगन्नाथ, श्रीबळभद्र, देवी सुभद्रा आणि सुदर्शन यांच्या लाकडी मूर्ती आहेत. हिंदू धर्मामधील सर्वात मानाच्या पवित्र चार धाम तीर्थक्षेत्रांपैकी जगन्नाथ मंदिर एक आहे. जगन्नाथ देव हा विष्णूचा एक अवतार मानला जातो. या मंदिराची उभारणी राजा अनन्गभिमादेवा याने केली असे मानले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com