नोटाबंदीमुळे महिंद्राच्या उत्पादनाला 'ब्रेक'

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 डिसेंबर 2016

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने 8 नोव्हेंबर रोजी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. मात्र नोटाबंदीमुळे मोटारींच्या विक्रीवर परिणाम झाल्याने महिंद्रा कंपनीने डिसेंबरमध्ये काही दिवस आपले कार उत्पादन बंद ठेवणार असल्याचे जाहीर केले आहे.

महिंद्राने डिसेंबरमध्ये काही दिवस उत्पादन बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. पुण्यातील चाकण प्रकल्पात कंपनीने "नो प्रॉडक्‍शन डे'ची घोषणा केली आहे. नोटाबंदीमुळे महिंद्राच्या निवडक चारचाकी आणि ट्रॅक्‍टर विक्रीला फटका बसला आहे. त्यामुळे मंदीच्या काळात मागणी अभावी पुरवठा नियंत्रित करण्यासाठी उत्पादन कमी करण्याचा निर्णय महिंद्राने घेतला आहे. महिंद्रा मोटारीच्या काही डिलर्सकडून नोटाबंदीच्या निर्णयानंतर अत्यल्प विक्री झाल्याचे आढळून आले आहे. अन्य कंपन्यांकडून देखील येत्या महिन्यांत काही दिवस मोटारींचे उत्पादन थांबवण्याची शक्‍यता आहे. मंदावलेल्या मागणीचा फटका केवळ प्रवासी मोटारींनाच नाही तर व्यावसायिक वाहनांनादेखील बसला आहे.

Web Title: No Production Day in Mahindra Chakan