करवाचौथ व्रताचा फायदा नाही - ट्‌विंकल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 ऑक्टोबर 2016

नवी दिल्ली - महिलांनी करवाचौथ व्रत करण्याचा काहीही फायदा नाही. हल्ली चाळीशीत दुसरा विवाह करण्याचा प्रसंग तुमच्यावर येऊ शकतो. मग करवाचौथचा उपयोग काय? असा सवाल करीत पुरुषांना दीर्घायुष्याची गरज नसते, असे ट्विट अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिने बुधवारी केले.

बॉलिवूडचा "खिलाडी' अक्षय कुमार याची पत्नी असलेल्या ट्विंकलच्या या ट्विटचे पडसाद सोशल मीडियात उमटले नसते तर नवल. अनेकांनी यावर रिट्विट करीत ट्विंकलला प्रतिप्रश्‍न केला. जर हे व्रत केल्याने लाभ झाला काय किंवा तुम्ही व्रत न केल्याने पतीचे निधन झाले तर काय फरक पडणार आहे, असे नेटिझन्सने विचारले आहे. यात आशावाद व सकारात्मक विचारांचा अभाव आहे, अशी टिप्पणीही केली आहे.

याची दखल घेत ट्विंकलने त्यालाही त्याच भाषेत उत्तर दिले आहे. ती म्हणाली, की असेही घडू शकते. म्हणूनच मी पुरुषांच्या दीर्घायुष्याची आकडेवारी तपासली आहे. यात 100 देश असे आढळले की कोणतेही व्रत न करता तेथील पुरुष भारतीय पुरुषांपेक्षा जास्त वर्षे जगतात. ट्‌विंकलची अभिनयातील कारकीर्द दखल घेण्यासारखी नसली, तरी हल्ली ट्‌विटवर सक्रिय असल्याने सतत चर्चेत असते. "मिसेस फनी बोन्स' हे तिचे पुस्तकही नुकतेच प्रकाशित झाले आहे.

Web Title: no profit by karwa chauth vrat