भारताच्या दबावापुढे ब्रिटन झुकला; प्रवाशांसाठी क्वारंटाइनचा नियम रद्द

कोविशिल्डचे दोन्ही डोस घेतलेल्या भारतीय प्रवाशांना मोठा दिलासा
uk corona.jpg
uk corona.jpg

नवी दिल्ली : पूर्ण लसीकरणानंतरही भारतीय प्रवाशांना क्वारंटाइनची सक्ती करण्याऱ्या युकेला भारतानं जोरदार विरोध दर्शवला होता. सातत्यानं भारतानं आपली बाजू लावून धरल्यानंतर अखेर युकेला भारताच्या दबावापुढे झुकावं लागलं आहे. त्यामुळे कोविशिल्डचे दोन्ही डोस घेतलेल्या भारतीय प्रवाशांना आता युकेमध्ये गेल्यानंतर क्वारंटाइन होण्यापासून सुटका होणार आहे.

भारतातील ब्रिटिश उच्चायुक्त अॅलेक्स इलियास यांनी सांगितलं की, कोविशिल्डसह युकेची मान्यता असलेल्या लसींचे दोन्ही डोस घेतलेल्या भारतीय प्रवाशांना आता युकेमध्ये क्वारंटाइन होण्याची गरज नाही. येत्या ११ ऑक्टोबरपासून हा दिलासा देणारा निर्णय लागू होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

काय होतं ब्रिटनचं नवं प्रवास धोरण

ब्रिटनच्या नवीन नियमानुसार दोन्ही डोस घेतल्यानंतरही प्रवासी भारतीयांना लस घेतलेले समजले जाणार नव्हते. त्यांना दहा दिवस विलगीकरणात राहावे लागणार होते. एखादी व्यक्ती आफ्रिका, दक्षिण अमेरिका, संयुक्त अरब अमिराती, भारत, तुर्कस्तान, जॉर्डन, थायलंड, रशियासह अन्य देशातून लस घेऊन ब्रिटनमध्ये आली तरी त्यांना लस न घेतलेले नागरिक म्हणून समजले जाणार होते. पण यातून आता भारतातील प्रवाशांना वगळण्यात आलं आहे.

ब्रिटनला भारतानं दिलं होतं सडेतोड उत्तर

ब्रिटनने दोन्ही डोस घेतलेल्या भारतीय प्रवाशांसाठी जाचक नियमावली लागू केल्यांनतर भारतानंही ब्रिटनच्या नागरिकांना झटका दिला होता. त्यानुसार, भारतानेही ब्रिटनमधून भारतात येणाऱ्या ब्रिटीश नागरिकांवर कोरोना निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे. हा नवीन नियम 4 ऑक्टोबरपासून लागू झाला आहे. त्यानुसार ब्रिटनहून येणाऱ्या सर्वांना हे नियम लागू आहेत. भारतात येणाऱ्या ब्रिटनच्या नागरिकांनाही आता सक्तीने क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. कमीतकमी 10 दिवस घरी किंवा क्वारंटाईन सेंटरमध्ये क्वारंटाईन व्हावं लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com