murgao
murgao

मुरगाव : नगराध्यक्षांविरोधात अविश्वासदर्शक ठराव

मुरगाव : दोन महिन्यांपूर्वी ध्यानी मनी नसताना ज्या नगरसेवकांनी मगोच्या भावना नानोस्कर यांना नगराध्यक्षपदावर विराजमान केले होते त्याच नगरसेवकांनी आज त्यांना अविश्वास ठरावाद्वारे हटविले. नगरविकासमंत्री मिलिंद नाईक यांच्या गटातील सर्वच्या सर्व तेरा नगरसेवक एकसंध राहून त्यांनी या पुढचा नगराध्यक्ष आपल्याच गटातील होईल याची रंगीत तालीमही दाखविली.

नानोस्कर यांना नगराध्यक्षपदावर नगरविकास मंत्री मिलिंद नाईक यांच्या आशशिर्वादामुळे संधी मिळाली होती. तथापि,त्या आपल्याच गटातील नगरसेवकांचे प्रस्ताव धुडकावित असल्याच्या रागापायी त्यांच्यावर एकूण 13 नगरसेवकांनी अविश्वास ठरावाची नोटीस बजावली होती. त्यावर आज शुक्रवारी चर्चा होऊन ठराव मंजूर करण्यात आला.

मडगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका मंडळाची बैठक घेण्यात आली. 25 नगरसेवकांपैकी चार नगरसेवक गैरहजर राहिले. याप्रसंगी बोलताना मावळत्या नगराध्यक्षा सौ नानोस्कर म्हणाल्या, आपण ज्या नगरसेवकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले ते तंतोतंत खरे असून याची  चोकशी दक्षता खात्यातर्फे केल्यास सगळं काही बाहेर येतील. सर्वांगीण विकासाचा ध्यास नजरेसमोर ठेवून आपण नगराध्यक्षाच्या खूर्चीवर विराजमान झाल्या होत्या पण, स्वकीयांनी त्यांना गैरव्यवहार करण्यास रान मोकळे मिळत नसल्याने आपली उचलबांगडी केल्याचे  नानोस्कर म्हणाल्या.

मुरगाव पालिका मंडळात आता संगीत खुर्चीचा खेळ सुरू झाल्याची टीका माजी नगराध्यक्ष दिपक नागडे यांनी केली.आपण ३४महिने स्थीर प्रशासन दिले होते पण आता अस्थिरता निर्माण झाल्याचे मत श्री.नागडे यांनी व्यक्त केले.

आपल्याच गटातील नगराध्यक्षा गैर कारभाराला खतपाणी घालत नाही म्हणून तीची उचलबांगडी करण्यात येते हा प्रकार अशोभनीय 
असल्याचे मत यतीन कामुर्लीकर या विरोधी गटातील नगरसेवकांने व्यक्त केले. सत्तारुढ गटातील नगरसेवकांचा भ्रष्टाचार उघड करण्याचे धाडस नानोस्कर यांनी दाखविल्याबद्दल कामुर्लिकर यांनी त्यांचे अभिनंदन केले.

दरम्यान, क्रितेश गांवकर, मुरारी बांदेकर, दाजी साळकर या तिन्ही नगरसेवकांनी त्यांच्यावर नगराध्यक्षांनी केलेल्या आरोपांचे खंडन केले. भ्रष्टाचारी मार्गाचा अवलंब करण्यासाठी आम्ही जर नानोस्कर यांच्यावर दबाव आणत होते तर त्याची दक्षता विभागाकडून चौकशी व्हावी अशी मागणी वरील तीनही नगरसेवकांनी पत्रकारांशी बोलताना केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com