Amartya Sen | नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांना कोरोनाची लागण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nobel laureate amartya sen tests positive for covid 19 corona update

नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांना कोरोनाची लागण

कोलकाता : अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेत प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यांची कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे. ते सध्या 89 वर्षांचे आहेत. (nobel laureate amartya sen tests positive for covid 19 )

सेन यांच्या एका जवळच्या व्यक्तीने सांगितले की, कोरोनाबाबत खबरदारी घेत असताना ते लोकांना भेटत नव्हते. 10 जुलै 2022 रोजी ते लंडनला जाणार होते, पण कोविडची लागण झाल्यामुळे त्यांनी हा कार्यक्रम रद्द केला. डॉक्टरांचे पथक सेन यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहे आणि ताज्या माहितीनुसार त्यांची प्रकृती स्थिर आहे. नुकतेच ते अमर्त्य संशोधन केंद्राच्या उद्घाटनासाठी कोलकाता येथे गेले होते. या कार्यक्रमात त्यांनी देशातील जनतेला एकजूट राहण्याचे आवाहन केले होते.

हेही वाचा: आता उमेश कोल्हेंच्या घराबाहेर राणा दाम्पत्याचे हनुमान चालिसा पठण!

Web Title: Nobel Laureate Amartya Sen Tests Positive For Covid 19 Corona Update

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Coronavirus
go to top