पंतप्रधानपदासाठी कोणालाही संधी नाही : पासवान

वृत्तसंस्था
रविवार, 5 ऑगस्ट 2018

पासवान यांनी दलित मुद्यावरही सविस्तर चर्चा केली. ते म्हणाले, दलित मुद्यावरून यापूर्वी सरकारच्या धोरणात अडचणी होत्या. त्यानंतर आता हे सर्व ठिक करण्यात आले आहे. भारत आर्थिक स्थितीत प्रगत होत आहे. तसेच ते पुढे म्हणाले, ''पंतप्रधानांवर कोणतेही आरोप नाहीत. ते अत्यंत तळागाळातून आले आहेत. ते 24 तासांपैकी 20 तास काम करतात''.

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणूक 2019 साठी पंतप्रधानपदासाठी कोणालाही संधी नसल्याचे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) घटक पक्ष असलेल्या जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी म्हटले आहे. नरेंद्र मोदी सरकारने मागील चार वर्षांत जेवढ्या संधी उपलब्ध करून दिल्या. स्वातंत्र्यानंतर अशा संधी उपलब्ध झाल्या नाहीत, असेही पासवान म्हणाले.

पासवान यांनी दलित मुद्यावरही सविस्तर चर्चा केली. ते म्हणाले, दलित मुद्यावरून यापूर्वी सरकारच्या धोरणात अडचणी होत्या. त्यानंतर आता हे सर्व ठिक करण्यात आले आहे. भारत आर्थिक स्थितीत प्रगत होत आहे. तसेच ते पुढे म्हणाले, ''पंतप्रधानांवर कोणतेही आरोप नाहीत. ते अत्यंत तळागाळातून आले आहेत. ते 24 तासांपैकी 20 तास काम करतात''.

दरम्यान, यापूर्वी काँग्रेसकडून पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणूक लढविल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर आता पासवान यांनी पंतप्रधानपदासाठी कोणालाही संधी नसल्याचे सांगितले. 

Web Title: Nobody has the chance to become PM says Paswan