गोवा: माजी मुख्यमंत्र्यांविरोधात अजामीनपत्र वॉरंट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 जून 2017

खाण घोटाळा प्रकरणातही कामत यांची चौकशी विशेष तपास विभाग करीत असून उच्च न्यायालयाने दिलेला अटकपूर्व जामीन रद्द करावा म्हणून राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला आहे. त्यामुळे कामत यांच्या समोरील अडचणीत आणखी वाढ झाली आहे

पणजी : "जायका " प्रकल्प अंतर्गत लुईस बर्जर घोटाळा प्रकरणात न्यायालयात हजर न राहिल्याने गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या विरोधात उत्तर गोवा जिल्हा आणि सत्र न्यायालयाने आज (गुरुवार) अजामीनपत्र वॉरंट जारी केले.

खाण घोटाळा प्रकरणातही कामत यांची चौकशी विशेष तपास विभाग करीत असून उच्च न्यायालयाने दिलेला अटकपूर्व जामीन रद्द करावा म्हणून राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला आहे. त्यामुळे कामत यांच्या समोरील अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

Web Title: Non-bailable warrant against former Goa CM Digambar Kamat