तमीळ अभिनेत्यांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट

पीटीआय
बुधवार, 24 मे 2017

उदगमंडलम : पत्रकाराने दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्याच्या सुनावणीवेळी न्यायालयात हजर न राहणाऱ्या आठ तमीळ अभिनेत्यांविरुद्ध न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले आहे.

उदगमंडलम : पत्रकाराने दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्याच्या सुनावणीवेळी न्यायालयात हजर न राहणाऱ्या आठ तमीळ अभिनेत्यांविरुद्ध न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले आहे.

न्यायदंडाधिकारी सेंथिल कुमार राजावूेल यांनी हे वॉरंट बजावले आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 17 जूनला होणार आहे. वॉरंट बजावण्यात आलेल्या अभिनेत्यांमध्ये सूर्या, सत्यराज, चरण, विजयकुमार, विवेक, सरथकुमार, अरुण विजयकुमार आणि अभिनेत्री श्रीप्रिया यांचा समावेश आहे.

एका तमीळ वृत्तपत्राने अभिनेत्रीला वेश्‍याव्यवसायप्रकरणी अटक झाल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. याचा निषेध करताना संबंधित कलाकारांनी पत्रकारांविरुद्ध अवमानकारक वक्तव्ये केली होती. याबद्दल त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल करण्यात आला आहे.

Web Title: non-bailable warrant against tamil actors