राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

raj thackeray
राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट

राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याविरोधात बीडच्या परळी (Parali) न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढलं आहे. २००८ च्या एका प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर सतत ते सर्व तारखांना गैरहजर राहीले. राज ठाकरेंना २००८ साली मुंबईत (Mumbai) अटक झाली होती. त्यावेळी परळीत एका बसवर दगडफेक केली होती. त्यावेळी राज ठाकरेंवर चार्जशीट दाखल करण्यात आली होती. या प्रकरणातील सर्व आरोपींना जामीन मिळाला होता. मात्र ते गैरहजर राहीले होते.

हेही वाचा: Tek Fog: भाजप IT सेलच्या Appचा पर्दाफाश, द्वेष पसरवण्यासाठी वापर

राज ठाकरे यांच्या अटकेनंतर राज्यभरात त्याचे पडसाद उमटले होते. यावेळी राज्यातील अनेक ठिकाणी जाळपोळ, तोडफोड, सरकारी मालमत्तांचं नुकसान अशा अनेक घनटा झाल्या होत्या. यावेळी राज्याती अनेकठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. बीडच्या परळी ग्रामीण पोलीस स्थानकात राज ठाकरे व कार्यकर्त्यांविरोधात जमाबंदीचं उल्लंघन करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, चिथानणीखोर भाष्य केल्याप्रकरणी कार्यकर्त्यांविरोधात भा.दं.वीच्या कलम १४३, ४२७, ३३६, १०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले होते.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Raj Thackeray
loading image
go to top