गैर भाजप आणि धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र यावे : डॉ. अमर्त्य सेन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 ऑगस्ट 2018

कोलकाता : आगामी 2019 च्या लोकसभा निवडणूकीत गैर भाजप आणि धर्मनिरपेक्ष पक्षांना एकत्र येऊन भाजपचा सामना करावा. आज सांप्रदायिकता हा देशासमोरील सर्वात मोठा धोका असल्याचे मत नोबेल पुरस्कार विजेते ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ डॉ. अमर्त्य सेन यांनी व्यक्त केले. कोलकाता येथील सिझर मंच ऑडिटोरियम येथे आयोजिक केलेल्या (भारत कोण पथे) भारत कोणत्या मार्गावर आहे? या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. 

देशातील सध्या परिस्थितीविषयी सेने यांना विचारले असता, सेन म्हणाले, मला वाटतं लोकशाही धोक्यात आहे. परंतु आम्ही त्यात सुधारणा करू शकतो. 2014 च्या लोकसभा निवडणूकीत भारतीय जनता पक्षाला केवळ 31 टक्के मते मिळाली होती आणि 55 टक्के प्रतिनिधी निवडून आले होते. त्यामुळेच भाजपचा सामना करण्यासाठी इतरांनी एकत्र यावे. या आधिही सेन यांनी नरेंद्र मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांन बरोबरच राष्ट्रीय लोकशाही आघाडीवरही (एनडीए) अनेकदा टिका केली आहे. 2014 पासून भारताने चुकीच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले असल्याची गंभीर टिकाही त्यांनी केली होती.

Web Title: Non BJP and secular parties should come together: Dr. Amartya Sen