खुशखबर! एलपीजी सिलिंडर 100 रुपयांनी स्वस्त

टीम ई-सकाळ
रविवार, 30 जून 2019

- उद्यापासून लागू होणार नवे दर.

नवी दिल्ली : विना अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 100 रुपयांनी कपात करण्याचा निर्णय इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने घेतला आहे. हे नवे दर 1 जुलैपासून (उद्या) लागू होणार आहे.

घरगुती विना अनुदानित गॅस सिलिंडरचे दर 737.50 रुपये प्रतिसिलिंडरपर्यंत गेले होते. त्यामुळे सर्वसामान्यांना याचा मोठा फटका बसत होता. मात्र, आता या 100 दरात रुपयांची कपात झाल्याने ग्राहकांना याचा मोठा फायदा होणार आहे. तसेच आता अनुदानित सिलिंडरचा दर 494.35 रुपये गेला आहे. 

याबाबतची माहिती इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने एक पत्रक काढून दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Non Subsidised LPG cylinders to be cheaper by Rs 100 from Monday

टॅग्स