खुशखबर! गॅस सिलेंडरच्या दरात कपात; नवे दर...

वृत्तसंस्था
रविवार, 1 मार्च 2020

- सहावेळा दरवाढ

- विनाअनुदानित सिलेंडरच्या दरात कपात

नवी दिल्ली : महागाईने त्रस्त झालेल्या नागरिकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. कारण आता घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे नवे दर मार्च महिन्यापासून म्हणजे आजपासून लागू करण्यात आले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मागील महिन्यात इंधनाच्या दरात वाढ केली होती. त्यावेळी पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेल्या तेलाच्या किमतीमुळे किमती वाढवण्यात येत असल्याचे कारण दिले होते. त्याचदरम्यान मार्च महिन्यात सिलेंडरच्या दरात कपात करण्यात येईल, असे संकेत दिले होते. त्यानंतर आता सिलेंडरचे दर कमी करण्यात आले आहेत. 

सहावेळा दरवाढ

मागील ऑगस्ट महिन्यापासून सलग सहावेळेस घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली. त्यानंतर आता पहिल्यांदा ही कपात केली जात आहे. 

gas cylinder

विनाअनुदानित सिलेंडरच्या दरात कपात

विना अनुदानित गॅस सिलेंडरच्या दरात 52.50 रुपयांनी कपात करण्यात आल्याने आतापर्यंत 893.50 रुपयांत मिळणारा घरगुती गॅस सिलेंडर मार्च महिन्यापासून 841 रुपयांना मिळणार आहे. 

कमर्शिअल सिलेंडरचे दरही कमी

यापूर्वी 1,540.50 रुपयांना मिळणारा कमर्शियल सिलेंडर (19 किलो) आता 1,331 रुपयांना मिळणार आहे. 

दरम्यान, हे नवे दर सध्या मुंबई आणि दिल्ली या मेट्रो शहरांसाठीच लागू असतील, अशी माहिती देण्यात येत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Non Subsidised Lpg price cut by rs 53 per cylinder

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: