ईशान्येत भारतात रेल्वेचे 43 प्रकल्प सुरू - गोहिन 

पीटीआय
बुधवार, 23 मे 2018

ईशान्य भारतात रेल्वेचे 43 प्रकल्प सुरू असून, ते पूर्ण झाल्यावर 5158 किलोमीटर लांबीच्या लोहमार्गाची या भागात भर पडेल, अशी माहिती रेल्वे राज्यमंत्री राजन गोहिन यांनी दिली. त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव देव या वेळी उपस्थित होते. 
 

आगरताळा - ईशान्य भारतात रेल्वेचे 43 प्रकल्प सुरू असून, ते पूर्ण झाल्यावर 5158 किलोमीटर लांबीच्या लोहमार्गाची या भागात भर पडेल, अशी माहिती रेल्वे राज्यमंत्री राजन गोहिन यांनी दिली. त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव देव या वेळी उपस्थित होते. 

आगरताळा-बंगळूर कॅंटोन्मेंटदरम्यानच्या दुसऱ्या हमसफर एक्‍स्प्रेसला गोहिन आणि देव यांनी हिरवा झेंडा दाखविला. त्या वेळी बोलताना गोहिन यांनी, ईशान्य भारताच्या विकासाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारची इच्छा असल्याचे नमूद केले. सध्या सुरू असलेल्या 43 प्रकल्पांसाठी 90 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आगरताळा-बंगळूर कॅंटोन्मेंटदरम्यान पाच जानेवारीला पहिली हमसफर एक्‍स्प्रेस सुरू झाली. आज दुसरी गाडी सुरू झाल्यामुळे बंगळूरला जाण्यासाठी आठवड्यातून दोनदा रेल्वेसेवा उपलब्ध झाली आहे. अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुरा रेल्वेच्या नकाशावर आले आहेत, मिझोराम व नागालॅंडमध्ये काम सुरू असल्याचे ते म्हणाले. मेघालयातही रेल्वेचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 

Web Title: In the north east, 43 projects of Railways are being started in India