...तर बैठकीस उपस्थित राहिले असते : मायावती

...तर बैठकीस उपस्थित राहिले असते : मायावती

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली. मात्र, या बैठकीत बहुजन समाज पक्षाच्या (बसप) सर्वेसर्वा मायावती उपस्थित राहण्यास नकार दिला. त्यावर बोलताना मायावती म्हणाल्या, ''पंतप्रधान मोदींनी ईव्हीएमबाबत चर्चा करण्यास बोलावले असते तर सर्वपक्षीय बैठकीला नक्की उपस्थित राहिले असते''.

पंतप्रधान मोदींनी बोलावलेल्या या बैठकीत 'एक देश, एक निवडणूक',  महात्मा गांधी जयंती यांसह विविध मुद्यांवर चर्चा करण्यात येणार आहे. या बैठकीसाठी विरोधी पक्षांसह सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, या बैठकीसाठी मायावती यांनी दांडी मारली.

त्याबाबत मायावती म्हणाल्या, लोकशाहीत निवडणूक ही कधीच समस्या असू शकत नाही. खर्चाच्या दृष्टीनेही निवडणुकीकडे पाहिले जाऊ नये.

गरिबी, महागाई मुद्यांवरून भरकटविण्याचा प्रयत्न

'एक देश, एक निवडणूक' ही संकल्पना म्हणजे गरिबी, महागाई, बेरोजगारी आणि वाढत्या हिंसाचारासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरुन लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न आहे, असा आरोपही मायावती यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com