अडथळ्यासाठी नव्हे; चर्चेसाठी हट्ट : कॉंग्रेस

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 डिसेंबर 2016

नवी दिल्ली : विरोधी पक्ष संसदीय कामकाजात अडथळा आणत असल्याचा सत्ताधारी पक्षाचा आरोप फेटाळून लावत आम्ही संसदीय कामकाजात अडथळा निर्माण करत नसून आम्हाला केवळ नोटाबंदीच्या मुद्यावर चर्चा हवी आहे, असे आज (शुक्रवार) कॉंग्रेसने स्पष्ट केले.

नवी दिल्ली : विरोधी पक्ष संसदीय कामकाजात अडथळा आणत असल्याचा सत्ताधारी पक्षाचा आरोप फेटाळून लावत आम्ही संसदीय कामकाजात अडथळा निर्माण करत नसून आम्हाला केवळ नोटाबंदीच्या मुद्यावर चर्चा हवी आहे, असे आज (शुक्रवार) कॉंग्रेसने स्पष्ट केले.

नोटाबंदीच्या मुद्यावर चर्चेची मागणी करत विरोधी पक्ष दोन्ही सभागृहात गोंधळ घालत असल्याने दोन्ही सभागृहांचे कामकाज वारंवार तहकूब होत आहे. या पार्श्‍वभूमीवर वृत्तसंस्थेशी बोलताना कॉंग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, 'नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना त्रास होत आहे. आम्हाला या विषयावर चर्चा करायची आहे. आम्ही आमच्या स्तरावर त्यासाठी प्रयत्न करत आहोत. मात्र केंद्र सरकार सहकार्य करत नाही. एवढेच नव्हे तर आम्ही अनेकदा अध्यक्षांना आणि संसदीय कामकाज मंत्र्यांना भेटलो आहोत. सरकारने एक बैठक घ्यावी आणि त्यात संसदीय कामकाज चालविणे कोणाची जबाबदारी आहे याचा निर्णय घ्यावा. आम्ही सहकार्यासाठी तयार आहोत. आमची प्राथमिक मागणी हीच आहे की चर्चा व्हावी. आम्ही अडथळा आणत नसून आम्हाला केवळ चर्चा हवी आहे.'

कॉंग्रेसचे राज्यसभेतील खासदार आनंद शर्मा यांनीही मोदी सरकारवर टीका केली आहे. 'पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्यामुळे भारतामध्ये अघोषित आर्थिक आणीबाणी निर्माण झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली घोडचूक मान्य करावी', अशा शब्दांत त्यांनी मोदींना लक्ष्य केले आहे.

Web Title: Not disrupting parliament, just demanding debat