'नफरत से नहीं, प्यार से जितेंगे' ; काँग्रेसची पोस्टरबाजी

वृत्तसंस्था
रविवार, 22 जुलै 2018

राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना आलिंगन देताना फोटो असलेले पोस्टर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी लावले. हे पोस्टर मुंबईतील अंधेरी परिसरात लावण्यात आले असून, यामध्ये नफरत से नहीं, प्यार से जितेंगे (द्वेषाने नाहीतर, प्रेमाने जिंकू) असे लिहिण्यात आले आहे.

मुंबई : लोकसभेत मोदी सरकारविरोधात अविश्वास ठरावावर शुक्रवारी मतदान घेण्यात आले. त्यादरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आलिंगन दिले. त्यानंतर यावर सर्वत्र चर्चा सुरु असताना आता काँग्रेसकडून मुंबईत पोस्टरबाजी सुरु करण्यात आली आहे. 'नफरत से नहीं, प्यार से जितेंगे', अशा आशयाचे पोस्टर लावण्यात आले.

राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना आलिंगन देताना फोटो असलेले पोस्टर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी लावले. हे पोस्टर मुंबईतील अंधेरी परिसरात लावण्यात आले असून, यामध्ये नफरत से नहीं, प्यार से जितेंगे (द्वेषाने नाहीतर, प्रेमाने जिंकू) असे लिहिण्यात आले आहे.

राहुल गांधींनी मोदी सरकारविरोधात अविश्वास ठरावावर मतदान घेतले जात असताना त्यांनी पंतप्रधानांच्या जागेवर जाऊन त्यांना आलिंगन दिले होते. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान मोदींशी हस्तांदोलनही केले होते. तसेच मोदींनी राहुल गांधींची पाठही थोपटली होती. राहुल गांधींच्या या कृतीमुळे त्यांच्यावर टीका करण्यात आली.

Web Title: Not by hatred but by love Congress posters at Mumbai