तुमच्याकडे आरोग्य सेतू अॅप नाही; मग, गुन्हा दाखल होणार

Not having Aarogya Setu app is a punishable offence say Noida police
Not having Aarogya Setu app is a punishable offence say Noida police

नवी दिल्ली : ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहे, पण आरोग्य सेतू अॅप नाही, अशा नागरिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. कलम १८८ अंतर्गत हे गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. नोएडा पोलिसांनी आरोग्य सेतू अॅप मोबाईलमध्ये ठेवण्याची ही सक्ती केली आहे.

गुन्हा दाखल केल्यानंतर जिल्हा दंडाधिकारी त्या व्यक्तीला शिक्षा द्यायची, दंड ठोठवायचा की, सोडून द्यायचं हे ठरवतील, असं नोएडाचं कायदा आणि सुव्यवस्था पोलिस उपायुक्त अखिलेश कुमार यांनी सांगितलं आहे. कोणत्याही व्यक्तीला पकडल्यानंतर लोकांनी जर हे अॅप लगेच डाउनलोड केलं, तर त्यांना कोणतीही कारवाई न करता सोडण्यात येईल. लोकांनी आदेश गांभीर्यानं घेऊन अॅप डाउनलोड करावं म्हणून पोलीस हे काम करत आहे. पण, वारंवार इशारा देऊनही जर अॅप डाउनलोड केलं नाही, पोलिस त्या व्यक्तीविरुद्ध कारवाई करतील, असेही त्यांनी सांगितले.

चौथ्यांदा वाढलं लॉकडाऊन; 'या' सरकारचा २९ मेपर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय

अॅप डाउनलोड करण्यासाठी त्या व्यक्तीकडे इंटरनेटच नसेल तर काय? या प्रश्नावर बोलताना कुमार म्हणाले, पकडल्यानंतर हे अॅप डाउनलोड करण्यासाठी व्यक्तीकडे इंटरनेट शिल्लक नसेल, तर पोलिस हॉटस्पॉटद्वारे ही सुविधा पुरवतील. पण, जर मोबाईलमध्ये स्टोरेज नसेल, तर मग त्या व्यक्तीचा नंबर घेतला जाईल. त्यानंतर त्या व्यक्तीनं अॅप डाउनलोड केलं की नाही, याचा पाठपुरावा केला जाईल, असे कुमार यांनी सांगितलं आहे.

सेतू अॅपविषयी
कोरोनाविषयीच्या माहितीत सूसुत्रता आणण्यासाठी त्याचबरोबर संसर्ग झालेल्या रुग्णांची माहिती ठेवण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आरोग्य सेतू अॅप तयार केलं आहे. हे अॅप देशभरात वापरलं जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com