अशाप्रकारे देश चालत नाही : राहुल गांधी

वृत्तसंस्था
बुधवार, 2 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - आत्महत्या केलेल्या सैनिकाच्या कुटुंबियांना भेटायला गेल्यानंतर राहुल गांधी यांना पोलिसांनी अटक केली. पोलिसांकडून सुटका झाल्यानंतर "ही योग्य कार्यपद्धती नाही. अशा प्रकारे देश चालत नाही' अशा शब्दांत राहुल गांधी यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली - आत्महत्या केलेल्या सैनिकाच्या कुटुंबियांना भेटायला गेल्यानंतर राहुल गांधी यांना पोलिसांनी अटक केली. पोलिसांकडून सुटका झाल्यानंतर "ही योग्य कार्यपद्धती नाही. अशा प्रकारे देश चालत नाही' अशा शब्दांत राहुल गांधी यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

"वन रॅंक वन पेन्शन' (ओआरओपी) प्रकरणी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या एका माजी सैनिकाने विष पिऊन आत्महत्या केली. त्यानंतर त्या सैनिकाच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी निघालेल्या राहुल गांधी यांना पोलिसांनी अडवले आणि ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. पोलिसांनी सोडून दिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुल गांधी यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. ते म्हणले, "ही योग्य कार्यपद्धती नाही. अशा प्रकारे देश चालत नाही. मला श्रद्धांजली वाहायची होती हा माझा दोष आहे का? मी मला त्यांच्या कुटुंबियांची भेट घ्यायची होती हे चूक होते का? भारत सरकारने देशातील नागरिकांचा आणि सैनिकांचा सन्मान करायला हवा. सरकारने त्या माजी सैनिकाच्या कुटुंबियांना त्रास झाल्याबद्दल त्यांची माफी मागावी.' तसेच "तुम्हाला जर अटक करायचे असेल तर मला करा. त्या (माजी सैनिकाचे कुटुंबिय) यांना अटक का करता? त्यांच्यासोबत जे काही झाले आहे ते अयोग्य आहे.' असे राहुल पुढे म्हणाले.

"मी ज्यावेळी पोलिस अधिकाऱ्यांना विचारले की तुम्ही असे का वागत आहात तर त्यांनी सांगितले की आम्हाला वरिष्ठांच्या सूचना आहेत. मला फक्त दोन मिनिटांसाठी त्या कुटुंबियांना भेटायचे होते. मात्र कुटुंबिय ज्यावेळी मला भेटण्यासाठी आले त्यावेळी पोलिसांनी त्यांना मारहाण केली आणि ताब्यात घेतले', असेही राहुल गांधी यांनी सांगितले.

Web Title: This is not how you run the country : Rahul Gandhi