पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिंदूविरोधी- हिंदू महासभा

वृत्तसंस्था
सोमवार, 5 डिसेंबर 2016

आग्रा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे व हजार रुपयांच्या नोटांवर घातलेली बंदी म्हणजे त्यांच्या शेवटाची सुरवात आहे. ते हिंदू विरोधी आहेत, असा आरोप अखिल भारतीय हिंदू महासभेच्या वरिष्ठ सदस्यांनी केला आहे.

आग्रा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे व हजार रुपयांच्या नोटांवर घातलेली बंदी म्हणजे त्यांच्या शेवटाची सुरवात आहे. ते हिंदू विरोधी आहेत, असा आरोप अखिल भारतीय हिंदू महासभेच्या वरिष्ठ सदस्यांनी केला आहे.

'नोटाबंदीचा निर्णय जाणीव पूर्वक हिंदूच्या विवाह मुहूर्ताच्या आधी लागू केला आहे. हजारो कुटुंबांना आपल्या मित्र व नातेवाईकांकडून पैसे उधार घ्यावे लागत आहेत. अनेकांना विवाहाची तारीख पुढे ढकलावी लागत आहे. काहींनी तर विवाहच रद्द केले आहेत. दुसरीकडे मात्र भारतीय जनता पक्षाचे मंत्री देशभरात इस्लामिक बँकांना प्रोत्साहन देत आहेत. मोदी हे हिंदूविरोधी आहेत. नोटाबंदी निर्णयामागे काय हेतू आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही,' असे हिंदू महासभेच्या राष्ट्रीय महासचिव पूजा पाण्डे यांनी म्हटले आहे.

'नोटाबंदीच्या निर्णयामुळे 200-300 रुपयांवर रोजंदारी करणारे व निवृत्तीवेतनावर अवलंबून असणाऱयांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. श्रीमंतावर कोणताही परिणाम पडलेला दिसत नाही. पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेले सर्जिकल स्ट्राइकबद्दल मोदी समर्थन मिळवत आहेत. परंतु, दहशतवादी घुसखोरी करताना दिसत असून, जवान हुतात्मा होत आहेत. खरोखरच सर्जिंकल स्ट्राइक झाला असेल तर आपल्याला त्याचा काहीच फायदा झालेला दिसत नाही,' असेही पाण्डे म्हणाल्या.

Web Title: note ban is the beginning of the end of modi era hindu mahasabha