'आता सर्कशीतील सर्वच प्राण्यांवर बंदी'?

अवित बगळे
शनिवार, 1 डिसेंबर 2018

 केंद्र सरकारने सर्कसमद्ये कोणत्याही प्रकारच्या जनावरांचा वापर करण्यावर बंदी घालण्याचे ठरवले आहे. सर्कशीत यापूर्वी वन्यपशूंच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.

पणजी- केंद्र सरकारने सर्कसमद्ये कोणत्याही प्रकारच्या जनावरांचा वापर करण्यावर बंदी घालण्याचे ठरवले आहे. सर्कशीत यापूर्वी वन्यपशूंच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.

घोडे, कुत्रे, चिम्पाझी, हत्ती अशा प्राण्यांचा वापर सध्या सर्कशीत केला जातो. वन्यपशू या व्याख्येत न येणारी जनावरे सर्कशीत असतात. मात्र आता सरसकट सर्वच प्राण्यांच्या वापरावर बंदी घालण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्या निर्णयाबाबत जनतेच्या आक्षेप आणि सूचनाही मागवण्यात आल्या आहेत.

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाने हा निर्णय केंद्रीय राजपत्रात प्रसिद्ध केला आहे. सहसचिव मंजू पांडे यांच्या सहीने प्रसिद्ध केलेल्या या निर्णयाविषयी काही आक्षेप असल्यास ते २८ नोव्हेंबरपासून ३० दिवसात नोंदवावे असे राजपत्रात नोंद केले आहे.

वन्यप्राण्यांच्या वापरावरील बंदीनंतर सर्कस व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. आता इतर जनावरेही वापरता येणार नसल्याने सर्कस म्हणजे केवळ मानवी कसरत असेच समीकरण रुढ होईल किंवा सर्कशी बंद तरी पडतील असे दिसते.

Web Title: Now all animals in circus are ban?