पासपोर्टसाठी हिंदीतही अर्ज करता येणार

वृत्तसंस्था
रविवार, 23 एप्रिल 2017

नव्याने पासपोर्ट काढण्यासाठी आता हिंदी भाषेमध्येही अर्ज करण्याची सुविधा परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातर्फे उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

नवी दिल्ली - नव्याने पासपोर्ट काढण्यासाठी आता हिंदी भाषेमध्येही अर्ज करण्याची सुविधा परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातर्फे उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

अधिकृत भाषांबाबतच्या संसदीय समितीच्या नवव्या अहवालातील या बाबतची शिफारस राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी स्विकारल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. 2011 मध्ये देण्यात आलेल्या या अहवालात पासपोर्टसाठी हिंदी भाषेत अर्ज करण्याची परवानगी देण्यात यावी तसेच पासपोर्ट कार्यालयांमध्ये हिंदी व इंग्रजी या दोन्ही भाषेतील अर्ज असावेत, अशी शिफारस करण्यात आली होती. तसेच या पासपोर्टमध्ये होणाऱ्या नोंदी सुद्धा हिंदीमध्येच करण्यात याव्यात असेही अहवालात सांगण्यात आले होते.

या शिफारसी राष्ट्रपतींद्वारे स्विकारण्यात आल्या आहेत. त्यानंतर परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने हा निर्णय घेतला. यापुढे पासपोर्ट काढताना इंटरनेटवरुन हिंदी भाषेतील हा अर्ज डाउनलोड करता येऊ शकतो व त्याद्वारे अर्ज करता येऊ शकतो.

Web Title: Now Apply For Passports In Hindi