'टॉक टू एके'द्वारे केजरीवाल करणार 'मन की बात'!

वृत्तसंस्था
मंगळवार, 5 जुलै 2016

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात‘ या कार्यक्रमाप्रमाणेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ‘टॉक टू केजरीवाल‘ नावाचा कार्यक्रम राबविणार आहेत. येत्या 17 जुलै रोजी सकाळी 11 वाजता या कार्यक्रमाचे उद्‌घाटन करण्यात येणार आहे.

महिन्यातून एकदा ‘टॉक टू एके‘ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून त्याद्वारे मुख्यमंत्री केजरीवाल जनतेशी संवाद साधणार असल्याची माहिती आम आदमी पक्षाने दिली. केजरीवाल यांना प्रश्‍न विचारण्यासाठी www.talktoak.com या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असून एक टेलिफोन लाईनही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ‘टॉक टू एके‘द्वारे नागरिकांना आम आदमी पक्षाच्या कामाचे मूल्यांकन करण्यासाठी आणि लोककल्याणाच्या कामात सहभाग नोंदविण्यासाठी केजरीवाल यांनी संधी उपलब्ध करून दिली असल्याचे ‘आप‘ने म्हटले आहे.

आगामी गोवा, पंजाब आणि इतर राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर आम आदमी पक्षाच्या दिल्लीतील कामाची नागरिकांना माहिती देण्याचा प्रयत्न ‘टॉक टू एके‘मधून करण्यात येणार असल्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Now, Arvind Kejriwal to have his own 'Man ki Baat'!

टॅग्स