बीएसएनएलची आता इंटरनेट दूरध्वनी सेवा 

पीटीआय
गुरुवार, 12 जुलै 2018

सध्याचे स्पर्धेचे वातावरण पाहता बाजारपेठेतील बीएसएनएलचा हिस्सा वाढणे कौतुकाची बाब आहे. ग्राहकांना सिमशिवाय कॉल करण्याची सुविधा इंटरनेट दूरध्वनी सेवेच्या माध्यमातून दिल्याबद्दल बीएसएनएलच्या व्यवस्थापनाचे मी अभिनंदन करतो. 
- विनोद सिन्हा, केंद्रीय दूरसंचारमंत्री  

नवी दिल्ली : बीएसएनएलने देशात प्रथमच इंटरनेट टेलिफोन सेवा सुरू केली असून, या सेवेमुळे ग्राहकांना मोबाईल ऍपवरून देशातील कोणत्याही दूरध्वनी क्रमांकाशी संपर्क साधता येईल. बीएसएनएलच्या ग्राहकांना कंपनीच्या "विंग्ज' मोबाईल ऍपवरून देशभरातील कोणत्याही दूरध्वनी क्रमांकावर कॉल करता येईल. याआधी मोबाईल ऍपवरून ग्राहकांना विशिष्ट ऍप वापरणाऱ्याच ग्राहकांशी संपर्क साधता येत होता. मात्र, दूरध्वनी क्रमांकावर कॉल करता येत नव्हता. 

या सेवेत बीएसएनएल ग्राहकांना कोणत्याही नेटवर्कमध्ये कॉल करता येतील. तसेच, यासाठी बीएसएनएल आणि इतर सेवा पुरवठादार कंपन्यांच्या वाय-फायची आवश्‍यकता असणार नाही. या सेवेसाठी ग्राहकांना चालू आठवड्यात नोंदणी करता येणार असून, 25 जुलैपासून सेवा प्रत्यक्ष सुरू होईल. 

दूरसंचार मंत्रालयाच्या अखत्यारीतील दूरसंचार आयोगाने वैध दूरसंचार परवाना असलेल्या कंपन्यांना वाय-फायशिवाय ऍपआधारित कॉलिंग सेवा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. या सेवेसाठी दूरसंचार कंपन्यांकडून शुल्क आकारण्यात येणार असून, सर्वसाधारण कॉलचे सर्व नियम याला लागू राहतील. 
कोट 

 

Web Title: Now BSNL Internet telephone service