गुगल असिस्टंट आता मराठीत...

वृत्तसंस्था
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

यासह गुगल आता कर्जवाटपही करणार आहे. गुगलने एचडीएफसी, आयसीआयसीआय, कोटक महिंद्रा आणि फेडरल बँकेशी करार केला आहे. 'गुगल पे' च्या माध्यमातून 'प्री अप्रुव्हड' इन्स्टंट कर्जाचे वितरण केले जाणार आहे.

नवी दिल्ली : इंग्रजी व हिंदी भाषेसह उपलब्ध असणारे गुगल असिस्टंट आता मराठी भाषा घेऊन येत आहे. गुगल असिस्टंटला आता मराठी भाषाही कळणार आहे, त्यामुळे गुगल असिस्टंटला आता तुम्ही मराठीत प्रश्न विचारू शकता. गुगल फॉर इंडियाचे चौथे एडिशन आज (ता. 28) दिल्लीत लॉन्च करण्यात आले. यात त्यांनी भविष्यातील त्यांच्या योजनांबाबत माहिती सांगितली. गुगल फॉर इंडिया अंतर्गत त्यांनी 'नवलेखा' हा नवीन प्रकल्प भारतासाठी आणला आहे.

गुगलचे सिनीयर इंजिनिअरिंग डायरेक्टर प्रवीर गुप्ता यांनी गुगल असिस्टंट हे मराठीत सुरू होणार असल्याची घोषणा केली. तसेच आता मराठीसह इतर सात भाषांमध्ये गुगल असिस्टंट उपलब्ध होणार आहे. आपल्याला कोणतेही प्रश्न विचारायचे असल्यास आता ते मराठीत विचारू शकता. या आधी इंग्रजी किंवा हिंदीमधून प्रश्न विचारावे लागायचे पण आता आपण आपल्या मायबोलीत हे प्रश्न विचारू शकता. 

यासह गुगल आता कर्जवाटपही करणार आहे. गुगलने एचडीएफसी, आयसीआयसीआय, कोटक महिंद्रा आणि फेडरल बँकेशी करार केला आहे. 'गुगल पे' च्या माध्यमातून 'प्री अप्रुव्हड' इन्स्टंट कर्जाचे वितरण केले जाणार आहे. यामुळे भारतीय डिजीटल फायनांन्स क्षेत्रातील स्पर्धा ही आणखीनच तीव्र होणार हे आता निश्चित झाले आहे. तसेच गुगल असिस्टंटवर आता रेल्वेचे लोकेशनही कळणार आहे.

Web Title: now google assistant available in marathi