रेल्वे प्लॅटफॉर्मवरही आता विवाह

वृत्तसंस्था
बुधवार, 11 जानेवारी 2017

 

नवी दिल्ली : रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मवर एखादा विवाह समारंभ आगामी काळात दिसल्यास आश्‍चर्य वाटायला नको. कारण रेल्वेनेच कमी गर्दीचे प्लॅटफार्म विवाहासाठी भाड्याने देण्याचा निर्णय घेतला आहे.

 

नवी दिल्ली : रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मवर एखादा विवाह समारंभ आगामी काळात दिसल्यास आश्‍चर्य वाटायला नको. कारण रेल्वेनेच कमी गर्दीचे प्लॅटफार्म विवाहासाठी भाड्याने देण्याचा निर्णय घेतला आहे.

रेल्वेने बिगरभाडे महसूल धोरणाचा स्वीकार केला असून, यातून दोन हजार कोटींचा वार्षिक महसूल मिळविण्याचे उद्दिष्ट आहे. या धोरणानुसार, रेल्वे, क्रॉसिंग, लोहमार्गाशेजारील जागा आणि रेल्वे स्थानकांचा जाहिरातीसाठी वापरण्यात येणार आहेत. याचबरोबर प्लॅटफॉर्म विवाहासाठी भाड्याने देण्यासोबत शैक्षणिक उपक्रमांसाठीही वापरण्यास देण्यात येणार आहेत. या धोरणाबाबत माहिती देताना रेल्वेमंत्री सुरेश प्रभू म्हणाले, "फक्त मालवाहतूक आणि प्रवासी भाड्यातून महसूल मिळवून दीर्घकाळ वाटचाल करणे शक्‍य नाही. त्यामुळे बिगरभाड्याचे पर्याय शोधायला हवेत. या योजनेत रेल्वेवर जाहिराती, रेल्वे रेडिओ योजना तसेच, प्लॅटफॉर्मवर एटीएम केंद्र बसविणे यांसारख्या बाबींचा समावेश आहे. यासाठी रेल्वेन बिगरभाडे संचालनालय स्थापन केले आहे. बिगरभाडे पर्यायातून मिळणाऱ्या महसुलात एप्रिलपासून 41 टक्के वाढ झाली आहे.''

"या योजनेतून रेल्वेच्या बाहेर आणि आतमध्ये जाहिराती करता येणार आहेत. तसेच, रेल्वेमध्ये उत्पादनांचे नमुने वितरित करणे आणि मार्केटिंग करण्यासही मोठ्या ब्रॅंडना परवानगी देण्यात येणार आहे. उत्पादनांचे नमुने रेल्वेत मोफत वाटण्यास परवानगी देण्यात येईल; मात्र त्यांच्या विक्रीला परवानगी देण्यात येणार नाही,'' असे प्रभू यांनी नमूद केले.

Web Title: now marriages possible at railway platforms