उत्तर प्रदेशमध्ये आता 'योगी' आंबा

पीटीआय
सोमवार, 8 मे 2017

लखनौ - या उन्हाळ्यात उत्तर प्रदेशातील नागरिकांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावाचा आंबा चाखता येणार आहे. शहरातील प्रसिद्ध आंबा उत्पादक हाजी कलीमुल्ला यांनी विकसित केलेल्या आंब्याच्या जातीला 'योगी' नाव दिले आहे.

लिहाबाद येथील आंब्याच्या बागेत तयार केलेल्या नव्या आंब्याच्या जातीला आता 'योगी' नाव देण्यात आले आहे. दशेरी या प्रसिद्ध आंब्याच्या जातीचा संकर करून हा आंबा विकसित केला आहे. हा आंबा अद्याप पक्व झालेला नसून, त्याच्या चवीबद्दल आताच सांगता येणे शक्‍य नसल्याचे हाजी कलीमुल्ला यांनी स्पष्ट केले. कलीमुल्ला यांनी याआधी विकसित केलेल्या आंब्यांच्या जातींना पंतप्रधान नरेंद्र मोदी, अभिनेत्री ऐश्‍वर्या राय आणि क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांची नावे दिली आहेत.

कलीमुल्ला यांची मलिहाबाद येथे पाच एकरांवर आंब्याची बाग आहे. कलीमुल्ला यांना आंबा उत्पादनात केलेल्या विविध यशस्वी प्रयोगांबद्दल त्यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना उत्तर प्रदेश सरकारने उद्यान पंडित पुरस्कार दिला आहे. त्यांना 'मॅंगो मॅन' अथवा 'आम आदमी' या नावानेही ओळखले जाते.

Web Title: Now name of the mango in up is 'Yogi'