आता पर्रीकरांवर कारवाई करून दाखवा- केजरीवाल

वृत्तसंस्था
सोमवार, 30 जानेवारी 2017

पणजी- संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनीही गोव्यामध्ये प्रचार करताना केजरीवाल यांच्याप्रमाणेच विधाने केली. या आधारावर निवडणूक आयोगाने आता पर्रीकर यांच्याविरोधात कारवाई करण्याची हिंमत दाखवावी, असे आव्हान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले आहे. 

पणजीपासून जवळ असलेल्या चिंबेळ येथे एका सभेत बोलताना पर्रीकर म्हणाले होते की, "एखाद्या नेत्याने रॅली आयोजित केली असेल आणि तुम्ही त्यांच्यासोबत फिरण्यासाठी 500 रुपये घेतले तर मी समजू शकतो.. तो काही 'प्रॉब्लेम' नाही. पण तुम्ही मतदान कराल तेव्हा कमळाचे चिन्ह निवडा. हे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे."

तत्पूर्वी केजरीवाल म्हणाले होते की, "काँग्रेस किंवा भाजपच्या उमेदवारांनी पैसे दिले तर ते नाकारू नका. ते पैसे तुमचेच असल्याप्रमाणे घ्या, परंतु मतदानावेळी आम आदमीच्या उमेदवाराला मत द्या."
निवडणूक आयोगाने केजरीवाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले त्याच दिवशी पर्रीकर यांनी हे वक्तव्य केले. 

एका वृत्तपत्रातील पर्रीकर यांच्या विधानाबद्दलच्या वृत्ताचा दाखला देत केजरीवाल यांनी निवडणूक आयोग आणि पंतप्रधान कार्यालयाला कारवाईचे आव्हान दिले आहे. 
 
Web Title: Now Punish Manohar Parrikar, Arvind Kejriwal Dares Election Commission