Indian Railway च्या ट्रेन गार्डला आता संबोधले जाणार 'ट्रेन मॅनेजर'

नाव बदलले तरी त्यांचे काम आणि वेतनश्रेणी पूर्वीप्रमाणेच राहणार आहे.
indian railways
indian railwaysSakal

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेच्या (Indian Railway) ट्रेन गार्डना आता 'ट्रेन मॅनेजर' असे संबोधले जाणार असून, (Train Guard) त्यांचे काम आणि वेतनश्रेणी पूर्वीप्रमाणेच राहणार आहे. याबाबत रेल्वे मंत्रालयातर्फे (Railway Ministry) आदेश काढण्यात आले आहेत. गार्डला 'ट्रेन मॅनेजर' (Train Manager) असे नवीन नाव देण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, असिस्टंट गार्डला 'सहायक पॅसेंजर ट्रेन मॅनेजर' आणि सीनियर पॅसेंजर गार्डला 'वरिष्ठ पॅसेंजर ट्रेन मॅनेजर' असे नाव देण्यात आले आहे. (Indian Railway Train Guard Name Change)

यासंबंधीचे पत्र रेल्वे बोर्डाने (Letter From Railway Board ) रेल्वेच्या सर्व झोनच्या महाव्यवस्थापकांना पाठवले असून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे. हा आदेश रेल्वेच्या अधिकृत ट्विटर (India Railway Tweeter Account) हँडलवरही शेअर करण्यात आला आहे. 2004 पासून रेल्वे कर्मचारी गार्डचे नाव बदलण्याची मागणी करत होते. अखेर ही मागणी पूर्ण करण्यात आली आहे.

indian railways
'ब्लू टूथ' म्हणजे काय? या नावामागे आहे एक विचित्र कथा

रेल्वेच्या आदेशानुसार आता सीनियर पॅसेंजर गार्ड - सीनियर पॅसेंजर ट्रेन मॅनेजर. असिस्टंट गार्डला असिस्टंट पॅसेंजर ट्रेन मॅनेजर, तर गुड्स गार्डला गुड्स ट्रेन मॅनेजर, सीनियर गुड्स गार्डला सीनियर गुड्स ट्रेन मॅनेजर आणि मेल/एक्सप्रेस गार्डला आता मेल/एक्स्प्रेस ट्रेन मॅनेजर या नावाने संबोधले जाणार आहे. (Indian Railway)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com