आता न्यायाधीशांना 'माय लॉर्ड' म्हणता येणार नाही

आता न्यायाधीशांना 'माय लॉर्ड' म्हणता येणार नाही

जयपूर : न्यायाधीशांना 'माय लॉर्ड' म्हणताना यापूर्वी चित्रपटात किंवा इतर ठिकाणी आपण ऐकले असेल. मात्र, आता न्यायाधीशांना 'माय लॉर्ड' म्हणता येणार नाही. याबाबतची नोटीस राजस्थान उच्च न्यायालयाने जारी केली आहे.

अॅड. शिवसागर तिवारी यांनी याबाबत जनहित याचिका दाखल केली. त्यांनी दाखल केलेल्या या याचिकेनंतर याबाबतचा निर्णय घेण्यात आला. अॅड. तिवारी यांच्यानुसार,  'माय लॉर्ड', 'युवर लॉर्डशिप' हे शब्द गुलामीची प्रतीकं आहेत. त्यामुळे या शब्दांचा उच्चार करणे देशप्रतिष्ठेच्या विरोधी आहे. असे सांगत त्यांनी याचिका दाखल केली. 

दरम्यान, न्यायाधीशांना 'माय लॉर्ड' किंवा 'युवर लॉर्डशिप' म्हणण्यापेक्षा 'सर' म्हटले जावे, असेही या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com