आता मुलींच्या शाळेत पुरुष शिक्षक नसणार!

आता मुलींच्या शाळेत पुरुष शिक्षक नसणार!

जयपूर : राजस्थान सरकारने मुलींच्या शाळेत शिकविणाऱ्या शिक्षकांबाबत नवा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता मुलींच्या शाळेत 50 वर्षाखालील पुरुष शिक्षक मुलींच्या शाळेत नसणार आहेत. संबंधित शाळेत महिला शिक्षकांचे प्रमाण जास्त असेल. 

राजस्थानच्या अनेक सरकारी शाळांमध्ये मुलींसोबत लैंगिक शोषण केले जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्याला रोखण्यासाठी राज्य सरकारने एक अजब निर्णय घेतला आहे. त्याबाबत राज्याचे शिक्षणमंत्री गोविंद दोटासरा यांनी सांगितले, की मुलींच्या सरकारी शाळांमध्ये 50 वर्षांच्या कमी वयाचे पुरुष शिक्षक शिकविणार नाहीत. या शिक्षकांऐवजी महिला शिक्षिकांची नियुक्ती केली जाणार आहे. जेव्हा महिला शिक्षिकांचे प्रमाण पुरेसे असेल तेव्हाच या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे, असे दोटासरा यांनी सांगितले. 

दरम्यान, सरकारच्या या निर्णयावर अनेक शिक्षणतज्ज्ञांनी यावर टीका केली आहे.  

लैंगिक शोषणाच्या तक्रारीत वाढ

पुरुषांकडून लैंगिक शोषण केले जात आहे. याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळेच याला काही प्रमाणात आळा बसेल, या दृष्टीने सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. 

...म्हणून महिला शिक्षिका हव्या

शिक्षक संघटना आणि शिक्षकांशी चर्चा केल्यानंतर आम्ही एक आराखडा तयार करून त्यानुसार कसं काम करता येईल, त्यादृष्टीने विचार करणार आहोत. महिला शिक्षिका असल्यास मुली त्यांना आपल्या आई-बहिणीसारखं मानून त्यांच्याकडे आपल्या समस्या, अडचणी मांडू शकतात. या फायदा होऊ शकतो, असेही दोटासरा यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com