Kerala Floods: अनिवासी भारतीयाने केली केरळला तब्बल 50 कोटींची मदत

वृत्तसंस्था
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

डॉ. शमशीर वायालील हे अबुधाबीत मुख्यालय असलेल्या व्हीपीएस हेल्थकेअरचे अध्यक्ष आहेत. आतापर्यंत केरळला वैयक्तिक स्वरूपात केलेली ही सर्वात मोठी मदत आहे. शमशीर हे मूळ मल्याळी असून अबुधाबीत स्थायिक झाले आहेत.

कोची : सध्या अबुधाबीत राहणाऱ्या पण मूळ भारतीय असणाऱ्या डॉ. शमशीर यांनी केरळमधील पूरग्रस्तांसाठी तब्बल 50 कोटींची मदत केली आहे. डॉ. शमशीर वायालील हे अबुधाबीत मुख्यालय असलेल्या व्हीपीएस हेल्थकेअरचे अध्यक्ष आहेत. आतापर्यंत केरळला वैयक्तिक स्वरूपात केलेली ही सर्वात मोठी मदत आहे. शमशीर हे मूळ मल्याळी असून अबुधाबीत स्थायिक झाले आहेत.

केरळमधील पूरग्रस्तांसाना घरे, आरोग्य व शिक्षण या तीन गोष्टींची मदत म्हणून डॉ. शमशीर हे केरळात मदतकेंद्र उभारणार आहे. 'केरळमधील नागरिकांसाठी हा सर्वात वाईट काळ होते. संपूर्ण राज्य जवळपास महिनाभर हे पूराने व्यापले असून, या परिस्थितीतून बाहेर पडायचा ते प्रयत्न करत आहेत. यासाठीच मी माझ्याकडून 50 कोटींची मदत करून त्यांची घरे, आरोग्य व शिक्षण पूर्ववत होण्यासाठी प्रयत्न करत आहे. ही मदत करण हे माझ्यासाठी प्राधान्य आहे. तसेत ईद व ओणाम हे सण जवळ आल्याने केरळमधील नागरिकांचे जीवन सुरळीत व्हावे यासाठी मी मदत करत आहे.' असे शमशीर यांनी सांगितले. 

गेल्या अनेक वर्षात असा पाऊस केरळमध्ये झाला नव्हता. यात लोकांचे जीव गेले तसेच अनेक नागरिक बेघर झाले आहे. लष्कराचे बचावकार्य हे जोरात चालू असून पूरग्रस्तांना मदत छावण्यांमध्ये ठेवण्यात आले आहे. तसेच देशभरातून केरळमधील पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन केले जात आहे.

Web Title: NRI helps kerala flood victims with 50 crores