पत्नीला सोडणाऱ्या 45 'एनआरआय'चे पासपोर्ट रद्द 

पीटीआय
मंगळवार, 5 मार्च 2019

ठाणे (पीटीआय) : पत्नीला सोडून देणाऱ्या 45 अनिवासी भारतीयांचे (एनआरआय) पासपोर्ट सरकारकडून रद्द करण्यात आले असून, या सर्वांविरुद्ध लवकरच लुक आउट नोटीस (एलओसी) जारी करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी दिली. 

याप्रकरणी एक नोडल एजन्सी नियुक्त करण्यात आली असून, महिला व बालविकास मंत्रालयाचे सचिव राकेश श्रीवास्तव हे तिचे प्रमुख आहेत. आपल्या पत्नीला सोडून दिलेल्या अनिवासी भारतीयांची छाननी करून आतापर्यंत 45 जणांवर कारवाई करत त्यांचे पासपोर्ट रद्द केले आहेत. या फरार पतींविरुद्ध लुक आउट नोटीस जारी करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे मनेका गांधी यांनी सांगितले. 

दरम्यान, एनआरआय व्यक्तींनी सोडून दिलेल्या महिलांना न्याय मिळवून देण्यासंदर्भातील एक विधेयक राज्यसभेत सादर करण्यात आल्याची माहितीही गांधी यांनी या वेळी दिली. 

Web Title: NRI passports cancellation