Delhi Violence : दिल्ली हिंसाचारावर अजित डोवाल यांचे वक्तव्य; म्हणाले...

वृत्तसंस्था
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत नागरिकत्त्व सुधारणा कायदा (सीएए) वरून मोठ्या प्रमाणात हिंसाचार होत आहे. त्यावर आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी याबाबत वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, दिल्लीतील हिंसाचारावर परिस्थिती नियंत्रणात यावी, यासाठी दिल्ली पोलिसांकडे अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

अजित डोवाल यांच्याकडे दिल्ली हिंसाचार नियंत्रणात आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याचपार्श्वभूमीवर परिस्थिती नियंत्रणात यावी, यासाठी दिल्ली पोलिसांकडे अधिकार देण्यात आले आहेत. आता यावर नियंत्रण मिळवणे शक्य होईल, असे सांगितले जात आहे.

दोन महिन्यांपासून ती होती बेपत्ता...पुन्हा चुकली रस्ता 

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळ परिस्थितीवर नियंत्रित ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असे एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले.

Image result for Delhi violence

पोलिसांना पूर्ण अधिकार

दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी आवश्यक पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला. तसेच निमलष्करी दलाच्या जवानांही तैनात करण्यात आले. याशिवाय पोलिसांना पूर्ण अधिकार देण्यात आले आहे, असे डोवाल यांनी स्पष्ट केले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NSA Ajit Doval has been given charge of bringing Delhi violence under control